शिरसोली (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील तरुणाने नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी २० जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेती कामाला गेलेली बहीण घरी आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

जगदीश प्रल्हाद पाटील (वय 32 ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो शिरसोली प्र.न. येथील अशोक नगर येथे मागील दहा वर्षापासून राहतो त्याची पत्नी एक महिना पासून माहेरी सोनबर्डी ता. एरंडोल येथे गेली आहे. तो प्लंबर काम करून उदरनिर्वाह करीत होता. मूळचा धरणगाव तालुक्यातील भोद कलाना येथील रहिवासी आहे.
आज मंगळवारी जगदीशची बहिण सुनंदा शांताराम पाटील ही शेती कामासाठी गेली असता दुपारी २ वाजता घरी परतली. दरवाजा वाजुनही जगदीशने न उघडल्याने सुनंदाबाईने शेजा-याच्या मदतीने दरवाजा तोडला घरात गेले असता जगदीश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आला. यावेळी बहिणीने आक्रोश केला. यावेळी पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी जगदीशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी आणले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणूका भंगाळे यांनी त्यास मृत घोषित केले.जगदीश पाटील याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात रवाना करण्यात आला.
जगदीशच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, २ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील हवलदार जितेंद्र राठोड, राजेंद्र ठाकरे, भावसार, पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.







