जळगाव (प्रतिनिधी ) ;– तालुक्यातील शिरसोली येथील जिजामाता विद्या प्रसारक मंडळ संचलित सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली (प्र.बो.)ता.जि. जळगाव येथे आज २८ शुक्रवार रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगतराव बारकू पाटील यांचा 80 ८० व्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक वर्ष 2023 -24 वर्षात एस.एस.सी. व एच.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी.वाय.एन.ठोसरे (माजी उपशिक्षणाधिकारी जि.प. जळगाव) हे होते. तर* प्रमुख पाहुणे म्हणून .व्ही एच. शिंदे (माजी विस्तार अधिकारी जि.प.जळगाव) ,.आर.जी जैस्वाल, .डी.टी.चौधरी , अँड. आर.आर.पाटील ,पुनमचंद भादू माळी, शालेय समिती चेअरमन .प्रमोद जगतराव पाटील हे होते. तसेच कार्यक्रमाला प्रेरणा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. .
आप्पा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा एक ते चार वर्गांच्या विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्य सौ.कल्पना प्रमोद पाटील यांनी केले* तर सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका सौ.कामिनी संजय पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन उपशिक्षका मनीषा नाना पाटील यांनी केले.