क्रीडा दिनानिमित्त विविध मैदानी खेळांचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये 22 जुलै ते 28 जुलै 2024 शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले .सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येत आहे.
आज 24 रोजी “क्रीडा दिवस ” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा दिनाची विद्यार्थ्यांकडून शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रसंगी उपशिक्षिका ज्योती पाटील, सुरेखा ढाके, कामिनी पाटील व विजय पाटील, एस के.पांडे उपस्थित होते .
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुरुवातीला ‘क्रिडा प्रतिज्ञा’ घेण्यात आली व त्यानंतर विद्यार्थ्यांची कबड्डी,लंगडी,गोळा फेक या खेळाची क्रीडा स्पर्धा घेण्यात आली व विजयी स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांना देशी खेळ कोणकोणते आहेत ते सांगण्यात आले. मोबाईल पासून दूर राहून देशी मैदानी खेळ खेळल्याने होणारे फायदे व महत्त्व क्रीडा शिक्षक विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून सांगितले कार्यक्रमप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. कल्पना पाटीलयांनी आहार व आरोग्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी पाटील यांनी तर आभार सौ. ज्योती धनगर यांनी मानले.