शिरसोली (प्रतिनिधी) – जळगांव तालुक्यातील शिरसोली येथून एक तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिसीग दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील १९ वर्षीय तरुणी शिरसोली येथे मावशीच्या घरी मागिल दहा ते पंधरा दिवसांपासून राहात होती. शिरसोली येथील मावशीच्या घरुन आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास कोणाला काही न सांगता निघून गेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मिसीग दाखल करण्याचे काम सुरू होते.
आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास मावशी आंघोळीसाठी गेली व मावस भाऊ झोपलेला होता.यावेळी तरुणी कोणाल काही न सागता घरातून निघून गेली आहे.