जळगाव (प्रतिनिधी) – शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालय येथे श्री संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर एस आंबटकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संस्थेचे संचालक निलेश खलसे, सांस्कृतिक प्रमुख डी. जी. कुलकर्णी, जी बी काळे, एस. एन. ताडे, एम. बी. पायघन, एस डी अस्वार, आर एस खलसे, जी. व्ही. बारी, व्ही एस भारुडे सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते.