शिरसोली ( प्रतिनिधी ) – येथील विठ्ठल मंदिर संस्थानमध्ये कार्तिक एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
एकादशीला पहाटे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची विशेष पूजा करण्यात आली. पूजा व काकडा आरती करण्याचा मान शिरसोली येथील रजनीकांत व उपमा अस्वार
भजनी मंडळाने विठ्ठलाची भजने आणि अभंग सादर केले. भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
अस्वार या भाविक दाम्पत्यास मिळाला. भाविकांना फराळ आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री भजन-कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेनफडू पाटील, सुरेश अस्वार, नाना मराठे, विलास महाजन, पांडुरंग वाणी, देवराम नागपुरे, जगन अस्वार, गणेश काटोले, बाळू आस्वार यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.









