बारी समाज विद्यालयात शालेय समितीच्या सभेत घोषणा
शिरसोली (वार्ताहर):- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज झालेल्या शालेय समितीच्या महत्त्वपूर्ण सभेत उपशिक्षक सुनील अर्जुन भदाणे यांची पर्यवेक्षक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे.


शालेय समितीच्या बैठकीत भदाणे यांच्या आजवरच्या शैक्षणिक कार्याचा आणि अनुभवाचा विचार करून ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडीची घोषणा होताच विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे, शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी आणि खजिनदार कमलाकर तांदळे यांनी भदाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य प्रवीण पाटील, उमाकांत बारी, संजय ताडे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, संजय काटोले, संभाजी अस्वार, राजेंद्र खलसे, हर्षल बारी आणि बापू कंखरे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. सुनील भदाणे यांच्या निवडीमुळे शाळेच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.









