शिरसोली ( प्रतिनिधी ) – गेल्या ७ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय इसमाचा आज सायंकाळी तालुक्यातील शिरसोली प्र .न . आणि प्र.बो. या दोन गावांना जोडणाऱ्या पुला जवळील नदीच्या साडपाण्यात आढळून आला असून गावात खळबळ उडाली आहे .

याबाबत माहिती अशी की जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र .बो. येथील बंडू उर्फ मधुकर लक्ष्मण बुंधे (बारी) वय ४५ हे २ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर कुणालाही न सांगता घरातून निघून गेले . तसेच त्याच्या दुसऱ्या म्हणजे ३ रोजी बंडू बुंधे यांची आई ठगूबाई बुंधे यांनी विकास बुंधे यांना विचारणा केली की , बंडू तुला दिसला का ? मात्र तो दिसला नाही . गावात तसेच नातेवाईकांकडे विचारपूस केली असता तो मिळून न आल्याने बंडू बुंधे यांचे लहान बंधू विकास बुंधे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार ४ रोजी दिली होती . मात्र आज सायंकाळी दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुला जवळील साडपाण्यात बंडू लक्ष्मण बुंधे यांचा मृतदेह आढळून आला आहे . सदर त्याची ओळख पटली असुन मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत







