जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली प्र. न. गावात नविन तलाठी सजा सुरु करणे बाबत कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे.
शिरसोली प्र. न. गावात तलाठी सजा असावी अशी ग्रामस्थांनी अनेक महिन्यांपासून मागणी आहे. मात्र हि मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ग्रामस्थांच्या वतीने पुनमचंद माळी आणि अशोक सोनवणे यांनी निवेदन देऊन लक्ष वेधून घेतले. यावेळी, तुमच्या अर्जावर कार्यवाही करण्याबाबत नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवेदनकर्त्याना दिली आहे.