शिरसोली (वार्ताहर) :- बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यालयाचे मूळ संस्थापक स्वर्गीय शंकरराव दशरथराव बारी व स्वर्गीय गं.भा. कस्तुराबाई शंकरराव बारी यांच्या स्मरणार्थ विद्यालयातून विविध विषयात प्रथम, द्वितीय, व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले.
शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज माध्यमिक शिक्षण मंडळ शिरसोली या संस्थेचे मूळ संस्थापक स्वर्गीय शंकरराव दशरथराव बारी व स्वर्गीय कस्तुराबाई शंकराव बारी यांच्या स्मरणार्थ विद्यालयात प्रथम, द्वितीय, व तृतीय आलेले विद्यार्थी तसेच प्रत्येक विषयातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन काटोले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सुरेश अस्वार, संस्थेचे कार्यकारी अधिकारी मनोज बारी, सुरेश बारी,संचालक शशिकांत वाणी, भास्कर खलसे, राजेश आंबटकर, संजय ताडे, अशोक काटोले, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, प्राथमिक विद्यालयचे मुख्याध्यापक गोपाल बारी हे उपस्थित होते.
मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर बक्षीस इयत्ता बालवाडी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यालयाचे माजी प्रभारी मुख्याध्यापक सुरेश शंकरराव बारी यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सदरचे बक्षीस दिलेत. प्रसंगी संस्थेचे कार्यकारी अधिकारी मनोज बारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सचिव सुरेश अस्वार यांनी शंकरराव बारी यांचे संस्थेसाठी चे योगदानबद्दल माहिती दिली. सुरेश बारी यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त मुलांना बक्षीस देण्याचं मनोदय व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून बक्षीस मिळवावेत असा आवाहन देखील त्यांनी केले.मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी आपले मत व्यक्त केले. प्रसंगी पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अपघात विमाबद्दलचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अर्जुन काटोले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख चंद्रकांत कुमावत यांनी केले. आभार सुनील भदाणे यांनी मानले. प्रसंगी सांस्कृतिक समितीचे मनीषा अस्वार, मनीषा पायघन, ज्येष्ठ शिक्षिका आशा कोळी. यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.