जळगाव (प्रतिनिधी ) ;- शिरसोली प्र. बो.विविध कार्यकारी सोसायटी लि.,ची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन शेणफडू आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेस व्हा.चेअरमन रामकृष्ण नेटके, माझी पस सभापती नंदलाल पाटील,माजी चेअरमन ऍड.विजय बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
संस्थेने मागील आर्थिक वर्षात रु.तीन कोटी पर्यंत कर्जवाटप केलेली असून, संस्थेने नवीन कर्जाची 100% वसुली केलेली आहे.चालू आर्थिक वर्षात नवीन 50 सभासदांची वाढ झालेली असून त्यांनीही कर्ज उचल केलेली आहे.संस्थेच्या वार्षिक अहवाल,हिशोब, ताळेबंद यांचे सचिव भालचंद्र वाणी यांनी वाचन करून दाखविले.
त्यावर सर्वानुमते चर्चा करून सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.सभेस असंख्य सभासद सह संचालक/विश्वस्त सुभाष रामदास बारी,राजू लोटू ताडे,विजय नीलकंठ काटोले,ज्ञानेश्वर माळी, समाधान बोबडे,बाळू तुळशीराम पाटील,उत्तम रघुनाथ बारी,सखुबाई मिठाराम पाटील,सुरेखा रामकृष्ण बारी लिपिक समाधान काटोले , निवृत्ती पाटील आदी उपस्थित होते.प्रस्थाविक व अहवाल वाचन सचिव भालचंद्र वाणी यांनी तर आभार मा. चेअरमन ऍड. विजय बारी यांनी मानले