जळगाव (प्रतिनिधी ) ;– शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज परिवहन समितीची स्थापना करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किरण कोळी यांनी केले. सुरुवातीला मंचावर उपस्थित मान्यवर व पालक यांनी माता सरस्वतीचे पूजन केले.या सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते.
सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी आलेल्या पालकांना परिवहन समितीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रवास करताना घ्यावयाची दक्षता याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले .त्यात परिवहन समितीला आलेले पालक श्याम महाडिक ,कैलास पाटील यांनी आपल्या पाल्यांच्या प्रवासा संदर्भात येणाऱ्या अडचणी यावर आपले विचार व्यक्त केले. प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, देवका पाटील हे उपस्थित होते. आभार मनीषा अस्वार यांनी व्यक्त केले.