लायन्स क्लब जळगाव सेंट्रल ,व चांडक कॅन्सर हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी ) तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना लायन्स क्लब जळगाव सेंट्रल ,व चांडक कॅन्सर हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने गर्भाशय मुख कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
आज ८ रोजी बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुमारे 300 विद्यार्थींना लायन्स क्लब जळगाव सेंट्रल व चांडक गर्भाशयमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले . सदर शिबिर हे चांडक हॉस्पिटल जळगाव येथे घेण्यात आले एच आर एच पी व्ही विरुद्ध या लसीकरणाद्वारे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करकापासून संरक्षण मिळणार आहे. सदरची लस 9 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत होती. सदर लसीकरणासाठी डॉ. श्रद्धा चांडक यांनी लसी संदर्भात सखोल मार्गदर्शन केले केले. लायन्स क्लब प्रकल्प अध्यक्ष आनंद श्री माळ, प्रकल्प प्रमुख किशोर बेहेराणी यांनी लस मोफत उपलब्ध करून दिली .या लसीकरणासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षिका सुरेखा दुबे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका नंदा अकोले, भारती ठाकरे ,देवका पाटील, आकांक्षा निकम, मनीषा पयधन , सविता आखाडे यांनी शिबिरात सहभाग घेऊन विद्यार्थिनींचे लसीकरण करून घेतले.