जळगांव (प्रतिनिधी) – ज्ञानज्योती व जीवनज्योती पुरस्काराचे आयोजन बाहेती शाळा या ठिकाणी करण्यात येऊन बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. सामाजिक कार्यासाठी जीवनज्योती पुरस्कार आयोजन करण्यात आले. ललित भास्कर शिंपी, पाचोरा यांचे स्मृतिदिनप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना ड्रॉइंगबुक, पेन्सील, रबर शॉपनर, रंगीत पेन्सीलसेट यांचे विद्यार्थीना मान्यवरांच्या हस्ते देणेत आले.
शिंपी समाजातील शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार ज्ञानज्योती स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. पदव्युत्तर विद्यार्थी मयुर जितेंद्र शिंपी याने (एम.टेक.) मध्ये विशेष प्राविण्य यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जे. पी. जाधव यांनी कैला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांचे हस्ते करून करण्यांत आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाहेती शाळेचे मुख्याध्यापक जाधव, प्रमुख अतिथी प्राथमिक मुख्याध्यापक रत्ना मालपुरे, इंडिया आशा फाऊडेशन संचालिका सुचेता बोरकर,मिनाताई सिरसाठे हे होते. तसेच आशा फाऊडेशन शिक्षीका रश्मी सिरसाठे व योगिता पाटील यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्ताविक राकेश सिरसाठे यांनी केले . सुचित जाधव, मनोज भांडारकर, गौरव सिरसाठे, अतुल जगताप, जितेंद्र शिंपी आदींनी सहकार्य केले.