जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह संस्था संचलित शिक्षण शास्त्र विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री साजरी करण्यात आली. तसेच विद्यालयाने महात्मा गांधी जयंती निमित्त राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हैदराबाद येथील महात्मा गांधी नॅशनल कौन्सिल ऑफ रुरल एज्युकेशन संस्था यांनी प्रमाणपत्र देऊन विद्यालयाचा गौरव केला



सुरुवातीला विद्यालयातील प्राचार्य एस.डी. सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी प्रा.व्ही.ए. गायकवाड,एस. वाय. नन्नवरे, आर. एस. पाटील, आर.एल. निळे, डॉ. एस. बी. पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक छात्राध्यापिका उपस्थित होते.
त्यानंतर नई तालीम अंतर्गत सकाळ सत्रात सेल्फ रिलायन्स ऍक्शन प्लॅन अंतर्गत विद्यालयातील छात्राध्यापक व छात्राध्यापिक यांनी तयार केलेले मास्क पोलीस मुख्यालयातील वाहतूक शाखेतील वाहतूक पोलीस, जीएस ग्राउंड वरील भाजीपाला विक्रेते यांना वाटप करण्यात आले. मास्क बनविण्यासाठी छात्राध्यापिकाना प्रा.आर.एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. दुपार सत्रात ऑनलाईन गूगल मीट द्वारे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सोनावणे उपस्थित होत्या, यावेळी डॉ .एस. बी.पाटील यांनी मार्गदर्शन केले, दरम्यान छात्राध्यापिका वौशाली पाटील, शोभा इंगळे, स्वाती पवार,काजल सोनवणे, तेजल कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच तिसऱ्या सत्रात ॲक्शन प्लॅन व आरोग्य उपक्रमाअंतर्गत टॉयलेट क्लिनिंगसाठी डॉ. पाटील यांनी तर, प्रा नन्नवरे यांनी योगा प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गायकवाड यांनी तर, आभार प्रदर्शन प्रा.आर.एस.पाटील यांनी केले.








