चांगल्या वर्तुणीकीच्या बंधपत्रावर दोघांची मुक्तता
जळगाव (प्रतिनिधी ) एप्रिल २०१४ रोजी जुन्या वादातून तीन जणांनी एकावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आई आणि तिच्या दोन मुलांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पात्र दाखल केल्यानुसार हा खटला चालला . आज या खटल्यातील निकाल म्हणून न्यायाधीशांनी आई आणि तिच्या एका मुळा दोन वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती. मात्र यातील एका आरोपीचे निधन झाले होते. मात्र आरोपी आणि फिर्यादी यांच्यात झालेला तडजोड अर्ज पाहता दोन वर्षांच्या चांगल्या वर्तुनुकीच्या बंधपत्रावर मुक्तता करण्यात आली आहे. राजाबाई प्रकाश वाणी व अनिल उर्फ भाऊसाहेब प्रकाश वाणी असे आरोपींची नावे आहेत.
४ एप्रिल २०१४ रोजी सोपान वाणी हा शेतातून घरी जात होता. त्यावेळी जुन्या वादातून दीपक वाणी, अनिल वाणी व राजाबाई वाणी यांनी सोपान याला लोखंडी आसारी व लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. या मारहाणीत सोपान याचा डावा डोळा निकामी झाला होता. तर भांडण सोडविण्यासाठी सोपान याचे आई वडील आले असता, त्यांना सुध्दा तिघांनी मारहाण केली होती. त्यानंतर याप्रकरणी शिवराम वाणी यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणा-या तिघांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपासी अधिकारी विक्रम निकुंभ यांनी सर्व तपास केल्यानंतर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. हा खटला न्यायाधीश डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात सुरू होता. सरकारपक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्याचे कामकाज सुरू असताना दीपक वाणी याचा मृत्यू झाल्याने त्याचे नाव आरोपी म्हणून वगळण्यात आले. तसेच फिर्यादी यांनी आरोपी यांच्यासोबत तडजोड झाल्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला.
मात्र, फिर्यादी व आरोपी यांच्या तडजोड अर्जाचा विचार करून दोन्ही आरोपींना शिक्षेऐवजी दोन वर्षाच्या चांगल्या वर्तवणुकीच्या बंधपत्रावर मुक्तता करण्यात आली आहे. बंधपत्रातील अटींचा आरोपींनी पालन न केल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागेल असा निकाल न्यायालयाने दिला आहे.