ह्रदयविकार, उच्च रक्तदाब, किडनी विकार, मधुमेह, थॉयरॉईड आदी तपासण्या होणार
जळगाव (प्रतिनिधी) : येथील काबरा हॉस्पिटलतर्फे तालुक्यातील किनोद ग्रामपंचायत येथे रविवारी ९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते २ वाजेदरम्यान जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शिबिराला उपस्थिती द्यावी, असे आवाहन डॉ. प्रफुल्ल काबरा यांनी केले आहे.
शिबिरात हृदयविकार, उच्च रक्तदाब, किडनी विकार, मधुमेह, टॉयफॉईड, थॉयरॉईड, मलेरिया, जुना खोकला, दमा, निद्रानाश, डोकेदुखी, लकवा, फिट येणे याबाबत तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, रुग्णाच्या गरजेनुसार शुगर, बीपी, कावीळ, चरबीचे प्रमाण, ऑक्सिजन पातळी, ईसीजी आदी तपासण्या मोफत केल्या जातील.
तसेच इतरही काही चाचण्या ह्या सवलतीच्या दरात उपलब्ध केल्या जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत नियमित ओपीडीचे उदघाटन लोकसेवा आरोग्य केंद्र, किनोद येथे होणार आहे. उदघाटन डॉ. अरुण पाटील यांचे हस्ते होईल. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संदीप चौधरी उपस्थित राहतील.