जळगाव ;- शिरसोली प्र.बो.ता.जि.जळगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले.
शिरसोली प्र.बो. येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी यांच्यातर्फे रक्तदान शिबिरचे आयोजन शिरसोली बाजरपेठ येथे करण्यात आले
शिबीरची सुरुवात शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत कार्यालयात माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर पंचायत समीती सभापती नंदलाल पाटिल शिरसोली प्र.बो. सरपंच प्रदीप पाटिल, उप सरपंच समाधान जाधव, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बापु परदेसी, उप अध्यक्ष गोलू पवार ,प्रविण बारी ,विकास पाटील, ग्रामस्थ यांच्या उपस्थितित रक्तदान कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली सदरील शिबीरात सर्व प्रथम सह पत्नीक ग्राम पंचायत सदस्या सीमा प्रवीण पाटिल,प्रवीण उत्तमराव पाटिल यानी रक्तदान करुन सुरुवात केली.
रक्तदान शिबीर हे गोलु पवार राष्ट्रवादी काँग्रेसने ता.उपाध्यक्ष यांनी आयोजन केले. रेडप्लस ब्लड बैंक जळगाव यांचे सहकार्याने संकलन करीता डॉ. आमोल शेलार ;डॉ.सूरज पाटिल;व श्री. माळी ,शुभम सोनार, राजेश्वर देसले ,मयुर पाटील ,कमलेश ढगे, राहुल काटोले, हेमंत बाविस्कर ,विप्लव पाटील, देवेंद्र बारी सुदर्शन बारी, देवेंद्र आणी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी देवेंद्र बारी, विशाल पाटील ,निलेश भारुडे, तुषार मराठे, भूषण बारी, दीपक बारी,आदींनी परिश्रम घेतले.