एरंडोल (प्रतिनिधी) :- शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने (पाटील) यांच्या संकल्पनेतून एरंडोल येथील एसटी डेपो येथे १०० एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, एरंडोल शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, एरंडोल शहर युवासेना प्रमुख प्रमोद महाजन, छोटू नाना उपस्थित होते. सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी व एसटी डेपो प्रमुखांनी शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने व शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांचे आभार मानले.