अमळनेर पोलिसांची गडखांब येथे धडक कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील गडखांब शिवारात पोलिसांनी धाड टाकून गांजाचे एक बिघा क्षेत्र उध्वस्त केले असून ओला व सुका गांजा पकडण्यात अमळनेर पोलिसांना मोठे यश आले आहे. कारवाईत पकडलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश लोटन पाटील असे आहे.


पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली की गडखांब शिवारात गट नम्बर २३२४ मध्ये एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केला आहे. त्यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना पंचनाम्यासाठी घेऊन पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव,प्रशांत पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे ,सुनील तेली, विनोद सोनवणे , राहुल पाटील, उदय बोरसे , सिद्धांत शिसोदे , गणेश पाटील, संजय सोनवणे, गणेश पाटील, श्यामल पारधी, निलेश पाटील, विनोद पाटील यांना घेऊन ७ रोजी सकाळी ६ वाजता छापा टाकला.
यात गडखांब येथील सुरेश लोटन पाटील या शेतकऱ्याने मका सोबत शेतात गांजा लावलेला आढळून आला. सुमारे सहा फूट उंचीची झाडे उगवलेली होती. शेतकऱ्याने शेतात पाच ते सात गोण्या ओला गांजा बांधून ठेवलेला दिसून आला. तसेच एका ठिकाणी गांजा वाळवायला ठेवलेला दिसला. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांने गांजा विकल्याचे देखील कबुल केले. फॉरेन्सिक पथकाने देखील पंचनामा सुरू केलाअसून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.








