पारोळा तालुक्यातील वसंतवाडी येथील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वसंतवाडी येथील एका शेतकऱ्याने त्याच्या स्वतःच्या शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अनिल लाला पवार यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली.
गुलाब बाळु वंजारी रा. वसंतवाडी हे नेहमीप्रमाणे स्वताचे शेतात काम करायला जायचे. बाजुच्या शेतामध्ये फवारणी करण्यासाठी आलेला शंभु भारमल पवार यानी अनिल पवार फोन करुन सांगीतले की, तुमच्या काकानी शेतात काहीतरी विषारी औषध प्राशन केले आहे. तेव्हा मी व त्याचा मुलगा किरण यानी मिळून त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे खाजगी वाहनाने प्राथमिक उपचाराकामी दाखल केले. त्यांची प्रकृती जास्त गंभीर असल्याने त्यांना हिरे मेडीकल कॉलेज, धुळे येथे उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरु असताना दि. ४ रोजी गुलाब बाळु वंजारी यास तपासुन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.