धरणगाव तालुक्यातील चमगाव येथील घटना
धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चमगाव येथील ४५ वर्षीय व्यक्तीने शेतातील कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी २७ जानेवारी रोजी दुपारी शेतात विषारी औषध घेतले होते. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता गुरुवारी ३० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासंदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेश्वर आनंदा सावंत (वय-४५, रा.चमगाव ता. धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, कमलाबाई पत्नी आशाबाई आणि सागर, विशाल ही दोन मुले असा परिवार आहे. चमगाव येथे शेती करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही वर्षापासून त्यांनी शेती करण्यासाठी कर्ज काढले होते. पण सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी सोमवारी २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शेतात असताना विषारी औषध घेतले.
प्रकृती खालावल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी ३० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.