अमळनेर तालुक्यातील वावडे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या एका शेतकऱ्याने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. ही घटना वावडे ता. अमळनेर येथे घडली.
ज्ञानेश्वर ताराचंद पाटील असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. कर्जबाजारीपणामुळे ते त्रस्त झाले होते, त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यांनी बुधवार दि. १८ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले होते. हा प्रकार लक्षात येताच, त्यांना धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना रविवारी सकाळी ८:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









