मुक्ताईनगर तालुका काँग्रेसचे तहसील येथे धरणे आंदोलन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुका काँग्रेसच्या वतीने दि . 2 रोजी शेतकरी विरोधी विधेयक मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तहसीलदार आवारात धरणे आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. युपी येथिल हाथरस व इतर लैंगिक अत्याचार संदर्भात निषेधाचा ठराव करून मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येऊन खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीचा निषेध करण्यात येऊन सरकार विरोधी कायद्याविषयी विविध वक्त्यांनी विचार व्यक्त केले. यामध्ये एस ए भोई, डॉ.जगदीश पाटील, शरद महाजन, आत्माराम जाधव, बाळासाहेब पाटील, आसिफ खान, इस्माईल खान,अँड. कुणाल गवई यांनी मनोगत व्यक्त केले.
भाजपा सरकारने संसदेत चर्चा न करता शेतकरी विरोधी तीन विधेयक संसदेत मंजूर करून घेतले. या दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यात आला व सदर विधेयक त्वरित रद्द करावे अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एस. ए. भोई, जिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील, शरद महाजन, जिल्हा सचिव, आसिफ खान इस्माईल खान, संजय पाटील , तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे,सादिक खाटीक, माजी महिला तालुकाध्यक्ष मानिषाताई जावरे, सुनील चौधरी,सुरेश भोलाने, बाळू कांडेलकर,शरद तुकाराम महाजन,अँड.कुणाल गवई,रमेश बारी, विजयसिंग पवार, अतुल जावरे, बाबूलाल बोराडे, पुंजाजी इंगळे,बाळू बारी,संतोष पाटील, प्रा.सुभाष पाटील, रामेश्वर धागे, प्रविण झोपे, रविंद्र यमनेरे, सलिम खान रशीद खान,शेख भैया शेख करीम, सुपडू बोरसे, प्रदीप पाटील, तोताराम पुरकर, शकील आझाद ,संजय धामोळे इत्यादी उपस्थित होते.








