जळगाव ( प्रतिनिधी ) – शेतीच्या वीजप्रश्नावर आज पुन्हा भाजपचे आमदार गिरीश महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधीक्षकांना निवेदन दिले .
जिल्ह्यात महावितरणकडून सक्तीने कृषिपंपांची वीज बिल वसुली केली जात आहे . आमदार गिरीश महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आधी सविस्तर चर्चा केली आणि महावितरणच्या अधीक्षकांना निवेदन दिले .
त्यानंतर आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले की , जिल्ह्यात अजूनही महावितरणच्या कारभारात सुधारणा झालेली नाही आम्ही आधी मोर्चा काढूनपण शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागणीचा विचार केला जात नाही त्यामुळे आज पुन्हा मुद्दाम निवेदन दिले . यंदा शेतकऱ्याच्या हातात कोणतेही पीक आलेले नाही कापूस , उडीद , मूग , मका , सोयाबीन ही पिके वाया गेली आहेत . कोरोना आणि अतिवृष्टीने सगळ्यांचे हाल झाले आहेत शेतकरी वीज बिल भरू शकत नाहीत किमान ८० टक्के लोकांनी वीज बिल भरावे हा सुलतानी नियम आहे असे असेल तर आम्ही आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोर्चे काढूत . महावितरणमध्ये विद्यावेतनावर काम करणाऱ्या लोकांचे हाल आहेत तसे राज्यात शेतकरी , विद्यार्थी , नोकरदार , कामगार , एस टी कर्मचारी अशा सगळ्यांचेच हाल सुरु आहेत हे सरकार रामभरोसे सरकार आहे , असेही ते म्हणाले .