जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील शेत शिवारामध्ये दीड एकर हरभरा कापून दादर पिकातून ट्रॅक्टर चालवत पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत दुल्लभ बेलसरे (वय ६४, रा.नशिराबाद ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नशिराबाद शिवारामध्ये हेमंत बेलसरे यांचे हातेड नाल्याच्या काठावर शेत आहे. या शेतात संशयित आरोपी सुभाष श्रीधर राणे (रा. महाबळ कॉलनी, जळगाव) यांनी गुरुवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पूर्वी फिर्यादी हेमंत बेलसरे यांच्या शेतातील दीड एकर हरभरा कापून घेऊन गेले. तसेच एक एकर दादर पिकातून ट्रॅक्टर चालवून ४० हजार रुपये किमतीचे नुकसान केले. म्हणून नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे हे तपास करीत आहेत.








