तळोदा (प्रतिनिधी) – शहरात २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील आजी माजी क्रीडा शिक्षकांचा सन्मान सत्कार करून क्रीडा दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश मराठे यांच्या नियोजना खाली करण्यात आले.

यावेळी , कार्यक्रम मध्ये सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक तसेच विद्यमान कार्यरत क्रीडा शिक्षक यांना शॉल श्रीफळ व विसल (शिटी) देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रम मधील सन्मानमूर्ती सेवानिवृत अरुण मगरे सर,के.जी.परदेशी सर,डी.जी. परदेशी सर,राजकपूर सूर्यवंशी सर, तसेच विद्यमान क्रीडा शिक्षक विजय पटेल सर,सुनील सुर्यवंशी सर,सुनील मगरे सर,प्रवीण जाधव सर,पदमेश माळी सर,निलेश सूर्यवंशी सर,प्रसाद भोगे सर,गजानन काटे सर,आय.पी.बैसाणे सर,सचिन पंचभाई सर उपस्थित सर्व क्रीडा शिक्षकांचे सत्कार करण्यात आले
याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ मार्गदर्शक डॉ जगदीश मराठे,डॉ गिरनार,केसरसिंग क्षत्रिय,नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय,कृषि उत्त्पन्न बाजार समिती संचालक भरत चौधरी सर,राष्ट्रवादी कार्यकर्ते संदीप परदेशी,माजी नगरसेवक गणेश दादा पाडवी,आदिल शेख,मुकेश पाडवी,महेंद्र पोटे,धर्मराज पवार,जयेश जोहरी,विकास खाटीक,इमरान सिकलीकर, कांत्या पाडवी,अन्नू कुरेशी उपस्थित होते…







