आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी ५० वर्षांनंतर प्रथमच निधी
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील मन्याड प्रकल्पात उजव्या कालव्याला गळती लागल्यामुळे शेतांचे नुकसान होत होते. यासह विविध बाबीची दखल घेत आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मन्याड उजवा कालव्यावर भरावाच्या ठिकाणी नवीन अस्तरीकरण (काँक्रीटीकरण) साठी राज्य शासनाकडून १६ कोटींचा निधी मंजूर झाला असून काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे कालव्याची वहन क्षमता पुर्स्थापित होण्यास मदत होणार आहे. तसेच कालव्यातून होणारी पाणी गळती थांबून नजीकच्या शेतक-यांचे शेतीचे नुकसान होणार नाही. तसेच भराव दुरुस्तीमुळे आर्वतनादरम्यान कालवा फ़ुटीची शक्यता देखील कमी होणार आहे.
मन्याड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाटचारी कॉक्रीटीकरणसाठी ५० वर्षात प्रथमच भरघोस असा निधी मिळाला आहे. तालुक्यातील मन्याड मध्यम प्रकल्प सन १९६९ मध्ये पूर्ण झाला असून सन १९७३ मध्ये सिंचन व्यवस्थापनेसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. मन्याड मध्यम प्रकल्प अंतर्गत मन्याड उजवा कालवा हा सण १९७३ साली पूर्ण झाला आहे. त्यामध्ये मन्याड उजवा कालवा हा मन्याड प्रकल्पाच्या उजव्या बाजूला असलेल्या नांद्रे गावाजवळून सुरू होतो. मन्याड उजवा कालव्याची लांबी २० किमी असून त्यावर एकूण वितरिका १३ आहेत तसेच १७ थेट आऊटलेट कार्यान्वित आहे. सदर कालव्याची संकल्पित वहन क्षमता १३६ क्यूसेक्स इतकी आहे. मन्याड उजव्या कालव्यामुळे एकूण ४८६४ क्षेत्र सिंचनाखाली येते.
मन्याड उजवा कालव्याच्या बांधकामास एकूण ४९ वर्ष पूर्ण झालेले असून सिंचन कालावधीत मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. मन्याड उजव्या मुख्य कालव्याची संकल्पित वहन क्षमता १३६ क्युसेक्स इतकी असून कालवा फक्त ७० क्युसेक्सने प्रवाहीत होत आहे. सिंचन आवर्तनात सदर मुख्य कालव्याच्या कि.मी. ० ते ५ मधील भरावाच्या ठिकाणी व पूर्वी केलेल्या जुन्या UCR Lining मधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. कालव्याला पाणी चालु असतांना बांधकामांमधून, भरावातून मोठ्या प्रमाणात पाणी गळणे तसेच पाझरण्यामुळे पाणी खुप प्रमाणात वाया जाऊन सिंचन आवर्तन कालावधीत वाढ होत आहे.
त्यामुळे कालव्या नजीकच्या शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होते तसेच पाणी सतत पाझरत असल्या कारणाने शेत जमीन पाणथळ होत आहे. आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मन्याड उजवा कालव्यावर भरावाच्या ठिकाणी नवीन अस्तरीकरण (काँक्रीटीकरण) साठी राज्य शासनाकडून १६ कोटींचा निधी मंजूर झाला असून काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे कालव्याची वहन क्षमता पुर्स्थापित होण्यास मदत होणार आहे. तसेच कालव्यातून होणारी पाणी गळती थांबून नजीकच्या शेतक-यांचे शेतीचे नुकसान होणार नाही. तसेच भराव दुरुस्तीमुळे आर्वतनादरम्यान कालवा फ़ुटीची शक्यता देखील कमी होणार आहे.