एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असतांना देखील आपल्या कब्जात विनापरवाना शस्त्र बाळगून फिरणा-या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशांत प्रताप चौधरी (वय २०, रा. शंकरराव नगर) आणि स्वप्निल उर्फ गोलु धर्मराज ठाकुर (वय २०, रा. शंकरराव नगर जळगाव) अशी हद्दपार गुन्हेगारांची नावे आहेत. शहरातील तुकारामवाडी परिसरात निशांत याच्या कब्जात सुरा आढळून आला. त्याला दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पांडे चौक नजीक रामदेव बाबा मंदीराजवळ स्वप्निल ठाकुर याच्या कब्जात देखील सुरा आढळून आला. दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप. निरी. दिपक जगदाळे, स. फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किशोर पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, नितीन ठाकुर, ललीत नारखेडे, राहुल रगडे, विशाल कोळी, छगन तायडे, किरण पाटील अशांनी केली आहे.