भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कजगावच्या शारदा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा राजकुवर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता सन १९९८ व १९९९ च्या दहावी वर्गातील विद्यार्थी या स्नेह मेळावयात सहभागी झाले होते

यावेळी माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या जीवनातील विविध पैलूंना उजाळा दिला अनेक शिक्षक भावुक झालेले दिसून आलेत विद्यार्थ्यांनीही शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला
स्नेहमेळावा सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी शिक्षक.एच. जे.पाटील यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून.बी. के. पाटील, बी.जे.पाटील .एस.के .पाटील, एस.बी.पवार, पी.बी मोरे , पी.सी. पाटील , लता सोनवणे , मोहन पाटील उपस्थित होते. प्रस्तावना आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. स्वप्नील खरे यांनी केले आभार प्रदर्शन.नितीन महाजन यांनी केले.
कार्यक्रमासाठी अशोक पाटील, भूषण शिनकर, सुजाता चव्हाण, रत्ना खैरनार, अनिल पवार, किशोर पाटील, शांतीलाल परदेशी, विकास महाजन , स्वप्नील ललवाणी , आनंद धाडीवाल , समाधान पाटील, विलास पाटील, निलेश पाटील, जगन्नाथ महाजन, भीमसिंग पाटील, अमोल भालेराव, अमरसिंग पाटील , हितेश पाटील, विजय गायकवाड, अमीन मणियार, विजय संचेती आदींनी परिश्रम घेतले.







