दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारार्थ उद्या सभा
जामनेर (प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उद्या ११ रोजी जामनेर शहरात भव्य जाहीर सभा उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारार्थ दुपारी ३ वाजता बोहरा स्कुलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. जामनेर मतदार संघात गेल्या ६ वेळेपासून विजयी होणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा उमेदवार गिरीश महाजन हे सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले असून त्यांचे एकेकाळचे मित्र दिलीप खोडपे सर हे शरदचंद्र पवार गटाकडून जामनेर विधानसभेची निवडणूक लढवीत आहे.
दिलीप खोडपे सर यांना जामनेर तालुक्यात ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उद्या ११ रोजी दुपारी ३ वाजता जामनेर शहरात जाहीर सभा होत आहे. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी राजकारणी नेत्याची सभा जामनेर शहरात होत असल्याने याची उत्सुकता जामनेरकर नागरिकांना लागून राहिली आहे. मंत्री गिरीश महाजन हे दिग्गज नेते असून त्यांचा जामनेर विधानसभा मतदार संघ हा बालेकिल्ला राहिला आहे. हा बालेकिल्ला ढासळण्यासाठी शरद पवार यांच्या सारख्या मुरब्बी नेत्याची जाहीर सभा होत असल्याने याकडे जामनेरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
ते जामनेर विधानसभा मतदार संघाच्या विकासाबाबत काय भूमिका मांडतात आणि गिरीश महाजनांवर काय सडकून टीका करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे . शरद पवार यांच्या सभेनंतर जामनेर विधानसभा मतदार संघाचे समीकरण बदलते का याची उत्सुकता लागून राहिली असून राज्यातील जनतेचे उद्या ११ रोजी होणार्या शरद पवार यांच्या सभेकडे लक्ष लागले आहे.
शरद पवार गटाचे रोहित पवार यांची शेंदुर्णी येथे झाल्येल्या सभेत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. जामनेर तालुक्यात खुंटलेला विकास यावर त्यांनी आपले भाषण केले होते . तसेच ९ रोजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची पहूर येथे जाहीर सभा झाली होती. त्यांनीही गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. तसेच ११ रोजी होणाऱ्या शरद पवार यांच्या जाहीर सभेकडे विरोधकांचे लक्ष लागून राहिले आहे . तसेच रोहित पवार आणि एकनाथराव खडसे यांच्या सभेला जामनेरकर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले होते. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांचा कौल हा महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांना मिळणारा मतदारांचा पाठिंबा पाहता गिरीश महाजन यांच्यासोबत होणारी लढत हि काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.