नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – न्यायमूर्ती उदय उमेश लळीत आज भारताचे ४९ वे सरन्यायाधीश बनले असून सकाळी १० : ३० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी , उपराष्ट्रपती जगदीप धनखर, कायदा मंत्री किरेन रिजिजू, माजी सरन्यायाधीश एनव्ही रमना, सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायाधीश आणि न्यायमूर्ती लळीत यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अतिशय सौम्य स्वभावाचे न्यायमूर्ती लळीत यांचा कार्यकाळ केवळ 74 दिवसांचा असेल. ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत









