जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गणेशचतुर्थीच्या निमित्ताने पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गणपतीच्या फोटोला हार पुष्प अर्पण करून कार्यशाळेस सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यशाळा दरम्यान तज्ज्ञांनी मूर्ती बनविताना शाडूच्या मातीचा वापर कसा करावा, प्लास्टर ऑफ पॅरिस टाळावे तसेच जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तीचे विसर्जन घरच्या घरीच करावे, याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. शाडू माती पासून विविध आकारातील गणपती बनविले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्या सौ.निलिमा चौधरी , सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.