• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सिनेस्टाईल थरार : मुक्ताईनगरपासून थेट अकोल्यापर्यंत दरोडेखोरांचा पाठलाग, निरीक्षक जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

अकोला येथे दरोड्याचा कट उधळला ; एलसीबीकडून एकाला अटक, ४ फरार

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे आणि अकोला पोलिसांच्या मदतीने, दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा कट उधळण्यात आला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या कारवाईत, पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याचे चार साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सोबत सपोनि अनिल जगन्नाथ जाधव, वाहन चालक पोहेकॉ दर्शन हरी ढाकणे दि. १५  रोजी रात्री ११ वाजता जिल्हा गस्तीवर होते. मुक्ताईनगर उपविभागात गस्त घालत असताना, अंतुली ते डोलारखेडा रस्त्यावर कुंड गावात एका इनोव्हा कारमधून चार जण उतरून दरोडा टाकण्याच्या तयारीत एका घराकडे जाताना दिसले.(केसीएन)पोलिसांचे वाहन दिसताच, आरोपी पुन्हा इनोव्हा कारमध्ये बसून डोलारखेडा फाट्यामार्गे नागपूर महामार्गावरून भरधाव वेगाने पळून जाऊ लागले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ चालक ढाकणे यांना वाहनाचा पाठलाग करण्यास सांगितले. पाठलाग करत असताना पोलिसांनी आरोपींना वारंवार थांबण्याचा इशारा दिला, परंतु इनोव्हा कार थांबली नाही. शासकीय वाहनाने इनोव्हा कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, इनोव्हा कार चालकाने शासकीय वाहनाला कट मारून पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

यामुळे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ मलकापूर, नांदुरा, बुलढाणा, अकोला येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सदर वाहन थांबविण्याबाबत कळवले आणि स्वतः पाठलाग सुरू ठेवला. दि. १६ रोजी पहाटे ०३:४० च्या सुमारास अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील रिधोरा शिवारात, अकोला शहरातील डिव्हिजन गस्तीचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाजवळ, नागपूर-धुळे महामार्गावर ट्रक आडवे लावून नाकाबंदी केली. नाकाबंदीमुळे आरोपींची इनोव्हा कार हळू झाली आणि बंद पडली.(केसीएन)पोलिस निरीक्षक आणि त्यांच्यासोबतच्या अंमलदारांनी तात्काळ आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, इनोव्हा कारमध्ये मागे बसलेले ३ आरोपी आणि ड्रायव्हर सीटजवळ बसलेला १ इसम दरवाजा उघडून पळून गेले. जुने शहर पोलीस स्टेशनचे पोउपनि रवींद्र करणकर, पोहेकॉ प्रमोद शिंदे आणि पोकॉ स्वप्नील पोधाडे यांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या झटापटीत इनोव्हा कार चालकाने स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या अंगावर गाडी आणून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना किरकोळ मुका मार लागला आहे.

पोलिसांनी तात्काळ इनोव्हा कार चालक अरबाज खान फिरोज खान (वय २३, रा. खदान, हैदरपुरा, आलिम चौक, अकोला) याला ताब्यात घेतले. इनोव्हा कार क्रमांक (एमएच ३० सीआर ४७२८) ची झडती घेतली असता, त्यामध्ये एक काळ्या रंगाचा चोरी केलेला बैल, एक तलवार, एक गुप्तो (धारदार शस्त्र), एक चाकू, एक लोखंडी रॉड, दोन दोर आणि काही कपडे असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य आणि हत्यारे मिळून आले. हे सर्व साहित्य जुने शहर पोलीस स्टेशन, अकोला येथे पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे. या घटनेतील अटक आरोपी अरबाज खान फिरोज खान याच्यासह फरारी आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.(केसीएन) सैय्यद फिरोज उर्फ अनडूल सैय्यद झहीर (रा. अजमपुरा, कसारखेडा, ता. बाळापूर, जि. अकोला), अफजल (पूर्ण नाव माहित नाही, रा. काली घाणीपुरा, बाळापूर, जि. अकोला), इम्रान (पूर्ण नाव माहित नाही, रा. विकुंड नदी, कसारखेडा, बाळापूर, जि. अकोला), तन्नू उर्फ तनवीर (पूर्ण नाव माहित नाही, रा. काली घाणी, बाळापूर, जि. अकोला), अफरोज खान उर्फ अप्प्या (रा. कुबा मशीद, अकोट फाईल, अकोला) या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक
संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील, सपोनि शरद बागल, सपोनि अनिल जाधव, पोहेकॉ दर्शन ढाकणे, सफीर रवी नरवाडे, पोहेकॉ सुनील दामोदरे, विजय पाटील, अक्रम शेख, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोहेकॉ भरत पाटील आणि जुने शहर पोलीस स्टेशन, अकोला येथील पोउपनि रवींद्र करणकर, पोहेकॉ प्रमोद शिंदे, पोकॉ स्वप्नील पोधाडे यांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक महोदयांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

खळबळ : रिंगणगावच्या १३ वर्षीय मुलाचा गळा चिरून शेतात फेकले..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

खळबळ : रिंगणगावच्या १३ वर्षीय मुलाचा गळा चिरून शेतात फेकले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा तरुणांना शिताफीने अटक

June 17, 2025
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार
1xbet russia

भुसावळ शहरातील दोन गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई

June 17, 2025
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

खळबळ : रिंगणगावच्या १३ वर्षीय मुलाचा गळा चिरून शेतात फेकले..!

June 17, 2025
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

सिनेस्टाईल थरार : मुक्ताईनगरपासून थेट अकोल्यापर्यंत दरोडेखोरांचा पाठलाग, निरीक्षक जखमी !

June 16, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा तरुणांना शिताफीने अटक

June 17, 2025
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार

भुसावळ शहरातील दोन गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई

June 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon