भुसावळ-येथे रेल्वे विभागा तर्फे या पावसाळ्यात वृक्षारोपणाचा उपक्रम विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय पर्यावरण व गृह व्यवस्था प्रबंधक पी.रामाचंद्रन यांच्या देख-रेखीत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
गेल्या १६ जुन पासून झाडे लावण्याचे कार्य सुरु करण्यात आले आहे.जून महिन्यात ७२५ झाडे लावण्यात आली तर १८ जुलै पर्यंत ८५१ वृक्ष लावण्यात आले. ही झाडे सागवान,सिसम, गुलमोहर,कडुलिंब,पिंपळ,बदाम व विविध जातीची असून भुसावळ मधील रेल्वे परिसरात लावण्यात येत आहे.यात रेल्वे अधिकारी वसाहत,स्काऊट गाईड, नेहरू रोड व इतर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.१० ते १२ विविध विभागातील कर्मचारी स्वतःहून या उपक्रमा मध्ये सहभागी होतात. येत्या काही दिवसात अनेक झाडे भुसावळ विभागाच्या वेगवेगळ्या स्थानकांवर लावण्यात येणार आहे.भुसावळ विभागात सध्या भुसावळ,मनमाड व बडनेरा या तीन ठिकाणी रेल्वे मालकीच्या नर्सरी आहेत.








