जळगाव ( प्रतिनिधी ) – सायकलिंगच्या विविध स्पर्धा गाजवणाऱ्या डॉ अनघा चोपडे शहरातील पहिली महिला ठरल्या आहेत SRBRM मालिका पूर्णां करणारी सायकलिस्ट डॉ अनघा चोपडे यांची वाटचाल प्रेरणादायी आहे .

भारतात ब्रेवेट्स सिरीज हा लांब पल्ल्याचा सायकलिंग उपक्रम आहे, यात 200 , 300 , 400 आणी 600 अंतरापर्यंतची आव्हाने पेलणाऱ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात डॉ अनघा यांनी या सर्व स्पर्धा 14 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या कालावधीत पुर्ण केल्या आहेत
14 ऑगस्टला औरंगाबाद , 28 ऑगस्टला पिंपरी चिंचवड , 12 सप्टेंबरला नागपूरला झालेल्या स्पर्धांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या 300 किमीच्या स्पर्धेनंतर त्या 400 किंमी ऐवजी थेट 600 किमीच्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या 17 सप्टेंबरला नांदेड येथे ही 600 किमीच्या अंतराची स्पर्धा झाली होती वाझिराबाद, नांदेड येथून बिलोली गावात मेडिकल सुप्रितेडंट आणी मेडिकल ऑफिसरसह ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले यासाठी 40 तासांचा कालावधी देण्यात आला होता डॉ अनघा यांनी 27 तास 46 मिनिट 9 सेकंदात हे अंतर पार केले होते
त्यांचे पती डॉ सुयोग चोपडे यांचाही सत्कार नांदेड सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनी केला होता डॉ अनघा यांना या स्पर्धांसाठी आहार आणि पोषणाबद्दलचे
मार्गदर्शन डॉ सुयोग चोपडे यांनी केले.
स्पर्धांची ही आव्हानात्मक मालिका पुर्ण करून डॉ. अनघा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिस्ट होण्याचा मान वयाच्या 37 व्या वर्षी मिळावला आहे महापौर जयश्री महाजन , शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला होता , आता त्यांनी युवापिढीसाठी फिटनेस जागृती करण्याचा संकल्प केला आहे सोशल मीडियावरही त्या सक्रिय आणि लोकप्रिय आहेत.







