जळगावात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २८ वर्षीय निवासी डॉक्टरची सोशल मीडियावरील फोटोंना लाईक करण्याचे टास्क आणि पैसे गुंतवणूक करण्याचे आमिष देऊन साडेबारा लाखांमध्ये फसवणूक केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर असलेले डॉ. प्रणव परशराम समृतवार(रा. सिव्हिल हॉस्पिटल हॉस्टेल जळगाव, मूळ रा. उमरसरा ता. जिल्हा यवतमाळ) यांना ९ नोव्हेंबर २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान टेलिग्राम खाते यावर आदित्य नावाने खात्यावरून तसेच इंस्टाग्राम खात्यावरील कोमल पांडे नामक खात्यावरून डॉ. प्रणव सामृतवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांना फोटो लाईक करण्याचे टास्क देऊन ९ हजार १५० रुपये त्यांनी देऊन विश्वास संपादन केला. मात्र फिर्यादीला रकमा गुंतवणुकीचे आमीष प्रलोभन देऊन वेळोवेळी १२ लाख ४२ हजार ३७० रुपये काढून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. डॉ. प्रणव समृतवार यांनी सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन टेलिग्राम आणि इंस्टाग्राम खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास रामकृष्ण कुंभार करीत आहे.