पाचोरा तालुक्यात नुकसान भरपाईची मागणी
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातगाव डोंगरी गावापासून ४ किलोमीटरवर असलेल्या अजिंठा पर्वतावर १ तारखेच्या रात्री ढगफुटी झाल्याने सातगावच्या शेतकऱ्यांची पिकासह शेतीही वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
यावर्षीच्या खरीप पिकाच्या पेरणीपासून पिकांना पुरेल इतकाच पाऊस सातगाव परिसरात आतापर्यंत पडत होता; मात्र रविवारच्या मध्यरात्रीला अजिंठा पर्वतावर जोरदार ढगफुटी झाल्याने नदी, नाल्यांना मोठा पूर आला. तसेच पुराचे पाणी नाल्यात मावत नसल्याने पुराने शेतातूनच वाट काढली. पुराने पीक व शेतातील माती हे सर्व काही नेले. नदीच्या पुराचे पाणी दुसऱ्या नाल्यात उतरल्याने सातगावच्या नदीकाठी असलेल्या घरांनाही पुराच्या पाण्याने विळखा घातला होता; मात्र जीवितहानी झाली नाही. शेतकऱ्यांची पिके तर गेलीच पण जमीनही वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.