एरंडोल ( प्रतिनिधी ) – अनंत चतुर्दशीच्या दिवशी एरंडोल शहरात नगरपरिषदेतर्फे ४ ठिकाणी मुर्त्या आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात येणार असून गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांना नगर पालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे की, स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कोविड – १९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जनबाबत शासनाच्या निर्बंधामुळे विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरिता नागरिकांच्या सोयीसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी नगरपरिषदेतर्फे शहरात मरिमाता चौक , म्हसावद नाका , कासोदा गेट , जुने पद्मालय तलाव (पिंप्री रोड) चार ठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
जमा होणाऱ्या निर्माल्यातून एरंडोल नगरपरिषदद्वारे खत निर्मिती करण्यात येणार आहे. नगरपरिषदद्वारे संकलन केलेल्या गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे.