जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मेहरूनण भागातील तांबापुर येथे सार्वजनिक जागी गांजा नामक अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तांबापूर येथे शेख मशरूख अब्दुल खाटीक ( वय – 42 ) राहणार गवळीवाडा तांबापुर हा इसम 25 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सार्वजनिक जागी गांजा अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस नाईक सुधीर साळवे करीत आहे.