धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील झुरखेडा येथे शेतात काम करणाऱ्या शेतमजूराला सर्पदंश झाल्याने त्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा दोन वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेंदरसिंग वारसिंग पावरा ९वय ४१ रा. खरगोन जि.बडवाणी मध्यप्रदेश ह.मु. झुरखेडा ता. धरणगाव) असे मयत मजूराचे नाव आहे. झुरखेडा गावात गेंदरसिंग पावरा हा तरूण पत्नी, तीन मुली आणि दोन मुले यांच्यासह गेल्या वर्षभरापासून वास्तव्याला होता.(केसीएन) शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गेंदरसिंग याला सर्पदंश झाल्याने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.