जळगाव ( प्रतिनिधी ) — भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील सरपंच सुवर्णा कोळी यांना मालमत्ता कर , घरपट्टी थकबाकीच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी भरल्याच्या दिवशी म्हणजे ऐनवेळी ३० डिसेंबर , २०२० रोजी सुवर्ण कोळी यांच्या सासर्यांनी या थकबाकीचा भरणा केला होता हा मुद्दा जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देत त्यांना सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरवावे अशी मागणी करणारी तक्रार ग्रामपंचायत सदस्य दीपक तायडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २३ मार्च २०२१ रोजी दाखल केली होती
या तक्रारीची चौकशी करून सुवर्णा कोळी यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २१ सप्टेंबररोजी जाहीर केला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ ( १ ) ह चे उल्लंघन सुवर्णा कोळी यांनी केले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे जवळपास ११ हजार ३०० रुपयांची ही थकबाकी ऐनवेळी भरली गेली होती .







