नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ;- कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (नुकताच एका नवा आदेश जारी केला आहे.सरकारी नोकरी लागली की निवृत्तीपर्यंत टेन्शन नाही असं म्हटलं जातं. मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही जाऊ शकतात असा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
या आदेशामध्ये वेगवेगळ्या मंत्रालयांना त्यांच्या प्रशासकीय देखरेखीखालील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये ) तसेच बँका, स्वायत्त संस्था आणि वैधानिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या कामाचं पुनरावलोकन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक हितासाठी कर्मचाऱ्यांवर ठेवायचे की त्यांना लवकर निवृत्त करायचे हे ठरवण्यात यावे असं या आदेशामध्ये म्हटलं आहे.
यासाठीच अधूनमधून सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची वेळोवेळी चाचपणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामामधील परिणामपणा, अर्थिक परिणामकारकता आणि तत्परता राखण्याची पद्धत या आधारांवर वेळेवेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापन केलं जावं असं सांगण्यात आलं आहे. या मूल्यमापनाच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर कायम ठेवायचे की त्यांनी लवकर निवृत्त करायचे हे ठरवलं जाणार आहे.