अमळनेर : वारंवार सूचना देऊनही गर्दी गोळा करण्यावरून दोन जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना कायद्यान्वये तर विनाकारण फिरणाऱ्या 16 जणांवर पोलिसांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंनघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , पोलीस नाईक शरद पाटील, सुनील पाटील , योगेश महाजन व आर सी पी प्लातून चे कर्मचारी यांनी शहरात फेरफटका मारला असता अग्रवाल उपहार गृहाचे मालक हरीश प्रेमचंद अग्रवाल व अग्रवाल डेअरी चे मालक विशाल राजकुमार अग्रवाल यांनी सूचना देऊनही दुकानांवर गर्दी जमवून खाद्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51ब , महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना कायदा 2020 चे कलम 11 प्रमाणे तसेच भादवी कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच संचारबंदी लागू असतानाही विविध ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या जगदीश नाना पाटील वय 25 रा पैलाड शनीपेठ , मुख्तार अब्दुल राज्जाक वय 38 रा कसाली मोहल्ला , जहीर अली कमर अली वय 38 रा गांधलीपुरा , भगवान पोपट पाटील वय 65 रा स्टेटबँकेसमोर ,सुरेश सुकलाल चौधरी वय 44 रा बंगाली फाईल , कमलेश हरीश जोशी वय 25 रा शिरूड नाका , आधार उत्तम पतीलव्य 48 रा पळासदळे ,रतीलाल जयराम पाटील 63 रा पैलाड ,राहुल प्रभाकर पाटील वय 22 रामेश्वर खुर्द , लीलाधर पुंडलिक कुंभार वय 40 रा पैलाड , राहुल गुलाब चौधरी वय 36 रा पातोंडा , रायसिंग पांडुरंग पाटील वय 52 रा खोकरपाट ,किशोर दिनकर देवरे रा पातोंडा शांताराम भालेराव पाटील वय 31 रा पातोंडा , नाशिर शेख इकबाल वय 37 रा जुना पारधीवाडा, समाधान जिजाबराव पाटील वय 32 रा संताजीनगर यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंनघन केले म्हणून कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.