पारोळ्यात समाजबांधवांचा उत्साह
पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथे माळी समाजाचे आराध्य दैवत संत सावता माळी यांची पुण्यतिथीनिमित्त शहरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
सकाळी माळी मढी येथून श्री सावता माळी पुतळ्याची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. प्रथम पालखीतून सावता माळी यांच्या मूर्तीची स्थापना करून तिचा अभिषेक भूषण सुरेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगरसेवक प्रकाश महाजन यांच्या हस्ते पूजन व माल्यापण करून अर्जुन रघुनाथ महाजन, रमेश महादू महाजन, समाज अध्यक्ष कैलास भावलाल महाजन यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
याप्रसंगी समाजाचे पंचमंडळ तसेच समाजातील प्रतिष्ठित समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माळी मढी येथून निघालेल्या या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पोस्ट गल्ली, सुदर्शन नगर, नगरपालिका चौक, बाजारपेठ या मार्गे ही मिरवणूक निघून माळी मढी येथे विसर्जित करण्यात आली.
या मिरवणुकीसाठी भगवान महाजन, नाना महाजन, नगरसेवक बापू तुकाराम महाजन, समाजिक कार्यकर्ता आबा सुनिल महाजन, सुभाष हरी महाजन, नगरसेवक दिपक अनुष्ठान, प्रदीप संतोष महाजन, बापु बळीराम महाजन, श्रीराम भुरा महाजन, आबा लोटन महाजन, बापु पुंज महाजन, नामदेव दगा महाजन, आप्पा सहादू महाजन, देवा सहादू महाजन, किसन लोटू महाजन, गुलाब शंकर महाजन, सावता महाजन, गोकुळ अर्जुन महाजन, भगवान झगा महाजन, नारायण दगा महाजन, भेय्या नारायण महाजन, आबा भास्कर महाजन, युवराज धनराज महाजन, नाना सिताराम महाजन, लक्ष्मण राजेंद्र महाजन, गोपाल राजधर महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. मिरवणूकित शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.