• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

विनाअनुदानित विद्यालय असूनही विद्यार्थ्यांची फी न घेण्याचा निर्णय ; राज्यभरात निर्माण केला आदर्श

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 16, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – देशभरात शिक्षणसम्राटांची कमी नाही. स्वतःच्या फायद्यासाठी पालकांकडून डोनेशन घेणे, फीसाठी पालकांना अडवणूक करणे, निकाल रोखणे असे प्रकार आजही घडताहेत. मात्र मेहरूण भागातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ हि संस्था याला अपवाद ठरली आहे. कोरोना महामारीमुळे सामान्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली असताना एक नवीन आदर्श निर्माण करीत या २०२०-२१ वर्षाची पालकांकडून कुठलीही फी न घेण्याचा निर्णय येथील संस्थाचालकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे संस्थेची विद्यालये हि विनाअनुदानित आहेत. त्यामुळे राज्यभरातून संस्थेचे कौतुक होत आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळच्या संचालकांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने संस्था अध्यक्ष तथा मनपाचे स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक, उपाध्यक्ष शामकांत सोनवणे उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला मागील इतिवृत्त व संस्थेची प्रस्तावना सचिव मुकेश नाईक यांनी केली. कोरोना महामारीमुळे मेहरूण परिसरात आलेले संकट आणि पालकांची आर्थिक स्थिती यावर विचारविनिमय करून चर्चा झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष स्व. सुरेश मामा नाईक यांच्या आठव्या पुण्यतिथीचे औचित्य साधत अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन शालेय विद्यार्थ्यांची सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाची १०० % फी माफ करून समाजात नवा आदर्श निर्माण केला.

तसेच, आगामी काळात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याविषयी देखील नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले. यावेळी संचालक संदीप आंधळे, राजेंद्र सानप, युवराज सानप, नरेंद्र नाईक, एकनाथ वंजारी, सिंधूबाई आंधळे, अर्चना नाईक यांच्यासह मुख्याध्यापिका शीतल कोळी, वासुदेव सानप रमेश चाटे, उज्वला नन्नवरे उपस्थित होते.

छोट्या संस्थेने दाखवले मोठे मन

कोरोना या जागतीक महामारीमुळे लोकं जगण्यासाठी व कुटुंबाला जगवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अशातच बऱ्याच शैक्षणिक संस्थांनी फी भरा अन्यथा निकाल, वह्या पुस्तके न देणे, ऑनलाईन शिक्षण बंद करणे अशी जबरदस्ती पालकांवर केली आहे अशा वेळी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थेने मोठे मन करून विद्यार्थ्यांना १००% टक्के फी माफ करून नुसतच जळगाव शहरच नव्हे, राज्यालाच नव्हे तर देशाला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालयाचे रंगकाम अजून बाकी आहे. विशेष म्हणजे संस्थेची विद्यालये हि विनाअनुदानित आहेत. त्यामुळे राज्यभरात संस्थेचे कौतूक होत आहे.

कुठे घेऊन जाणार एवढे सारे धन ?
सध्या जगभरात कोरोना महामारी सुरु आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश पालकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक नाही, कोरोनामुळे वैद्यकीय खर्चाला पैसे संपले हे सर्व आम्ही आजही पाहत आहोत. अशा वेळी त्यांना धीर देणे महत्वाचे आहे. त्यामुळे अवास्तव फी आकारण्याच्या जमान्यात संस्थेने सामाजिक जाणीव कायम ठेवून या वर्षाला कोणत्याच विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. पैसे कमवण्याचा हेतू न ठेवता विनाअनुदानित असूनही संस्थेला येणारा आर्थिक भार संचालक मंडळ स्वतः पेलणार आहे.
– प्रशांत नाईक, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ


 

 

Previous Post

कंपनी मालकाची साडेदहा लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon