जळगाव (प्रतिनिधी ) – स्वयंसिद्धाच्या माध्यमातून महिलांना स्व-संरक्षणाचे धडे देणाऱ्या, मुलींच्या सबलीकरणासाठी कोणताही मोबदला न घेता प्रशिक्षण देणाऱ्या महिला पोलिस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम-जंजाळे यांचा मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेतर्फे ‘वूमन आयकॉन’ अवॉर्डने सन्मान करण्यात आला.
दिल्ली एनईसीआरटी भवन येथे मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या शासनमान्य संस्थेतर्फे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. निकम या आदिवासी आश्रम शाळांमधील मुलींच्या सबलीकरणासाठी मानधन न घेता प्रशिक्षण आयोजित करतात. शासनाने किंवा संस्थांनी गरीब, गरजू मुला-मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण देण्याची त्यांची नेहमी तयारी अाहे. या कार्याबद्दल निकम यांची पुरस्कारासाठी निवड झाली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने हा पुरस्कार पोस्टामार्फत त्यांना पाठवला. निकम यांनी हा पुरस्कार पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या हस्ते स्वीकारला. मानव संसाधन केंद्र जळगावचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, एएसआय गायकवाड, पप्पू देसले सर यांचे सहकार्य लाभले.