सांगली: – सांगलीत कोरोना संसर्गाचा कहर वाढल्याने सांगलीत आठ दिवसाचा तातडीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्या ५ मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केली आहे.सांगलीतील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.