सांगली (वृत्तसंस्था ) – ०१९ साली पलूस कडेगाव मध्ये आमचा उमेदवार विजयी झाला असता मात्र शिवसेनेने ती जागा काँग्रेसला विकली.”असा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपची सत्ता आली आहे, त्यानंतर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेवर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.
“आगामी विधानसभा निवडणुकीत कडेगाव पलूस मध्ये भाजपचा आमदार होणार आहे.२०१९साली आमचा आमदार निवडून आला असता पण ही जागा शिवसेनेने काँग्रेसला विकली.”असे पाटील म्हणाले.