जळगाव ;- जिल्हा नांदेड तालुका अर्धापूर गाव मालेगाव येथील आशा कर्मचारी यांच्या मोर्चात आशा कार्यकर्ती यांनी आरोग्य सेविका यांच्या कामाबद्दल केलेल्या असंयुक्तिक विधानाबाबत आज २९ जून २१ रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हापरिषद बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना जळगाव सोबत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आरोग्य कर्मचारी संघटना जळगाव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव त्याचप्रमाणे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना संयुक्तरीत्या निवेदन देण्यात आले.